ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्यमंत्र्यांच्या दौ-याला रिंगरोड बाधितांचा गतिरोधक

चिंचवड, दि. ११ - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि.१२) होणार आहे. ही उद्‌घाटने भूमिपूजने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाता प्रथमच बंदिस्त सभागृहातून होणार आहेत. पहिल्यांदाच शहरातील विकासकामांची '' उद्‌घाटने केली जाणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शनिवारी पुण्यातही कार्यक्रम आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त वेळ नाही. ते केवळ दीडच तास देऊ शकणार आहे. त्यामुळे '' उद्‌घाटन करण्यात येणार आहे, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली आहे. सत्ता येऊन पाच महिन्याचा काळ उलटून गेला आहे. सत्ता आल्यानंतर एखाद्या विकास कामाचे उद्‌घाटन, भूमिपूजन या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात येणार आहेत

चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी प्रस्तावित रिंगरोडला विरोध केला आहे. हा रिंगरोड रद्द करावा, यासाठी रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दीड महिन्यापासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. रिंगरोड बाधित नागरिकांचा सत्ताधा-यांवर रोष आहे. शहरातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांना रिंगरोड बाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यातच शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात येत आहेत.

रिंगरोड बाधित नागरिकांचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'विघ्न' येऊ शकते, असा स्थानिक गुप्तचार यंत्रणेचा अहवाल आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहातून शनिवारी दुपारी तीन वाजता शहरातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे. एमआयडीसी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन, पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचे उद्‌घाटन, निगडी भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भूमिपूजन आणि साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचे '' भूमिपूजन करणार आहेत. याशिवाय पुणे पोलिसांनी तरुणींच्या सरंक्षणासाठी तयार केलेल्या 'बडी कॉप'चे Posted On: 11 August 2017