ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तीन महिन्यात शहरातील कच-याचा प्रश्न सोडवू - आयुक्त हार्डिकर

चिंचवड, दि. १२ - पिंपरी-चिंचवड शहराच्या कचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेतील त्रूटी दूर करून नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यात शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश् सोडवण्यात यश येईल, असे आयुक्त   श्रावण हार्डिकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्त हार्डिकर म्हणाले की, कचरा आरोग्यांच्या अनेक तक्रारी आहेत. सध्या प्रभागनिहाय मनुष्यबळ कमी आहे. तसेच, गाड्यांची देखील कमतरता आहे. यापूर्वी कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रिया, कामातही त्रूटी होत्या. त्या दूर करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू झाले आहे.

कचरा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय-योजना करण्याचे नियोजन केले आहे. नवीन निविदा प्रक्रिया होऊन येत्या तीन महिन्यांत हा प्रश् निश्चित सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक् केला.