ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विजयानगरच्या वैभवशाली दुनियेचे यथार्थ दर्शन- आयुक्त श्रावण हर्डीकर

चिंचवड, दि. १६ - उत्तम निरीक्षण करणारा  उत्तम  छायाचित्रण  करू शकतो. उत्तम निरीक्षणाद्वारे प्रत्येक क्लिक मधून  विजयानगरच्या  वैभवशाली   दुनियेचे  यथार्थ  दर्शन  देवदत्त कशाळीकर यांनी घडविले  आहे  असे  मत आयुक्त  श्रावण हर्डीकर  यांनी 'the  lost  empire' या  छायाचित्र  प्रदर्शनाच्या उदघाटन  प्रसंगी  व्यक्त केले.

स्वातंत्र्यदिनाच्या  दिवशी  पु .ना . गाडगीळ  कलादालनामध्ये  हंपीमधील  छायाचित्रांचे प्रदर्शनाच्या  उदघाटन  प्रसंगी जागतिक कीर्तीचे  चित्रकार  रवी परांजपेखासदार श्रीरंग  बारणे, महापौर नितीन काळजे, आयुक्त  श्रावण हर्डीकर, पक्षनेते  एकनाथ पवार, अजित गाडगीळ, अमित गोरखे, समीर परांजपे , ओंकार भिडे,  सचिन पटवर्धननगरसेवक  राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, अश्विनी  चिंचवडे, अपर्णा डोके, सुरेश  भोईर, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती   नाना  शिवले, गोरख  भालेकरसहआयुक्त  दिलीप गावडे, अण्णा  बोदडे उपस्थित होते.

आयुक्त पुढे म्हणाले, पिंपरी-चिंचवड या मोठया विकसित नगरीमध्ये कालच पालिकेने लोकार्पित केलेले नवे स्वरूपातील  वेब पोर्टलवर आपल्या शहरातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखांवर आधारित  फोटो  फोटो  स्टोरी  रोजच्या रोज अपलोड  करून  शहराविषयी माहिती  कुतूहल  निर्माण करून जगाला आपल्या शहराची ओळख करून देऊ शकतो. हे काम करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी देवदत्त कशाळीकर याना दिल्या. कशाळीकर यांनी छाया प्रकाशाचा  उत्तम   वापर केला असल्याचे  मत त्यांनी व्यक्त केले  

ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रकार  रवी परांजपे  म्हणाले की, जगाच्या  कानाकोपऱ्यामध्ये   भारतीय  शिल्पकला   इतिहास   पोहोचविण्याचे  काम  देवदत्त कशाळीकर यांनी केले आहे. एकनाथ  पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी  केलेआभार नाना शिवले  यांनी मानले.