ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

स्मार्ट सिटीच्या रद्द झालेल्या सभेला आता शुक्रवारचा मुहूर्त

चिंचवड, दि. १७ - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या सभेला आता उद्या (शुक्रवार)चा मुहूर्त मिळाला आहे. स्मार्ट सिटीच्या अध्यक्षांना वेळ नसल्याने शनिवारी (दि.१२) रोजी होणारी सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. पालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचला ही सभा होणार आहे.

कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक, सभा महापालिकेतील मुख्य भवनात शनिवारी (दि.१२) सकाळी अकरा वाजता होणार होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर असणार होते. मात्र, त्यांना वेळ नसल्यामुळे ऐनवेळी सभा रद्द करावी लागली होती. आता या सभेला शुक्रवारचा मुहूर्त मिळाला आहे.

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सभेत वैधानिक प्रस्तावर चर्चा होईल. त्यात प्रामुख्याने स्वाक्षरीचे अधिकार बहाल करणे, शिक्क्याला मंजुरी देणे. कार्यालयीन पत्ता अधिकृत करणे, कंपनी सचिव, कंपनी चार्टट अकाऊंटची (सीए) नेमणुक करणे, एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅनसिटी प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे या प्रमुख प्रस्तावांचा समावेश आहे. याशिवाय शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले यांचा संचालक मंडळात समावेश करणे या विषयाचाही समावेश आहे.

संचालक मंडळामध्ये महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर.एस.सिंग यांचा समावेश आहे.