ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चिंचवड कॉंग्रेसतर्फे निषेध

चिंचवड, दि. १८ - महापालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच शहरात येऊन गेले. यावेळी सुरू असलेल्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण, रिंग रोड, अनधिकृत बांधकामे या प्रश्नावर चकार शब्द उच्चारला नाही. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीने निषेध केला आहे.

यासंदर्भात चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतक-यांच्या कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुंबईत झालेल्या मराठा मोर्चाचे गांभीर्य ठेवता आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीचे आश्वासन लक्षात ठेवता सरकारने नागरिकांना गृहीत धरले आहे. शास्ती कराचा प्रश् सोडविला नाही.

मुख्यमंत्री शहरात आल्यानंतर रिंग रोडच्या प्रश्नावर काहीतरी मार्ग सूचवतील, अशी अपेक्षा बाधित नागरिकांना लागली होती. त्यामुळे नागरिक शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहासमोर जमा झाले होते. मात्र, निवेदन स्वीकारता मुख्यमंत्री निघून गेल्याने हजारो नागरिकांची निराशा झाली आहे. नोटबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे.

त्यातच जीएसटी लागू झाल्यामुळे शेवटचा घटक असलेल्या सामान्य नागरिकाला भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांत वेगवेगळी आश्वासने देऊन भाजप सरकारने नागरिकांना भुलभुलैय्या करीत ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत नाराजीचा सूर असून सरकारच्या अशा धोरणाचा निषेध करण्यात येत आहे, असे नवले यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.