ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिंगरोड पर्यायी मार्गाने वळवावा, संघर्ष समितीचे राज्यमंत्र्यांना साकडे

चिंचवड, दि. १९ - वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट वस्तीतून देता पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली.

घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.१८) मुंबईत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेऊन रिंगरोड बाधितांना न्याय देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे विजय पाटील, रेखा भोळे, रजनी पाटील, नारायण चिघळीकर आदी सहभागी झाले होते.

पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणी पर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी मुंबईत नगरविकास राज्यमंत्री पाटील यांची भेट घेऊन रिंगरोड पर्यायी मार्गाने वळविण्याचे एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रस्तावित रिंगरोड पिंपरी पालिका प्राधिकरणाच्या हद्दीतून जात आहे. वाल्हेकरवाडी, रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळेगुरव, रहाटणी, कासारवाडी या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून हा रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट लोकवस्तीतून नेता, पर्यायी मार्गाने वळवावा आणि बाधित नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.