ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अधिकारी करणार अहमदाबाद बीआरटी पाहणी दौरा, स्थायीसमोर प्रस्ताव

चिंचवड, दि. २२ - बीआरटी विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, सर्व नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. अहमदाबादमध्ये होणा-या अडीच दिवसाच्या कार्यशाळेसाठी पदाधिका-यांची शाही बडदास्त ठेवली जाणार आहे. तारांकित हॉटेलमध्ये निवास भोजनाची सोय आणि विमान प्रवास राहणार आहे. या दौ-याच्या खर्च 'जीईफ' फंडातून केला जाणार आहे. त्याला मंजुरी देण्यासाठीचा विषय आगामी स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवला आहे. दरम्यान, या अभ्यास दौ-यासाठी किती खर्च येणार,  याची आकडेवारी बीआरटीएस विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहे.

वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने १० रस्त्यांवर बीआरटीएस वाहतूक सेवा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. तथापी, हे नियोजन कागदोपत्री राहत असून केवळ दोन रस्त्यांवर बीआरटीएस सेवा सुरु आहे. रेंगाळलेले बीआरटीचे मार्ग सुरु करण्यासाठी प्रशासनाच्या अद्याप कोणत्याच हालचाली सुरु नसल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआटीएस विभागातर्फे केंद्राच्या शहरी विकास विभागाच्या सूचनेवरून जागतिक बँक एसयुटीपी यांच्या संयुक् विद्यमानाने राष्ट्रीय बीआरटीएस गोलमेज परिषद घेण्यात आली होती. या परिषदेला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका पदाधिका-यांना बीआरटीची अधिक माहिती मिळावी, म्हणून पालिका पदाधिका-यांचा अहमदाबाद अभ्यास दौ-यांचे आयोजन केले आहे. त्यानूसार सार्वजनिक वाहतूक यावर अहमदाबादचे शिवानंद स्वामी यांनी अडीच दिवसाची कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या अभ्यास दौ-यांसाठी महापालिका महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका पालिका अधिका-यांचा समावेश राहणार आहे.

या कार्यशाळेत विकास योजना, गमनशीलता योजना, नगर नियोजन योजना, स्थानिक पुनर्विकास योजना, नदी विकास योजना, वर्तुळाकर रस्ते, मेट्रो वाहतूक प्रणाली, बीआरटीएस वाहतूक प्रणालीचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच अहमदाबाद शहरातील सांस्कृतिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेस तीन Posted On: 22 August 2017