ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मतदार जनजागृतीसाठी ९१ लाखाच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समोर

चिंचवड, दि. २३मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंपरी पालिकेतर्फे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. त्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. मात्र यासाठी दुपटीने वाढीव खर्च झाला आहे. सुरुवातीला ८१ लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असताना आता पुन्हा ९१ लाखांच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडली. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेतर्फे शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी, झोपडपट्टीमध्ये पथनाट्ये सादर केले. फलक, महिला बचत गटांद्वारे मतदार जनजागृती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, सोसायट्यांचे अध्यक्ष सभासदांचे मेळावे, कंपनी मालक, कामगारांचे मेळावे, गॅस वितरकांद्वारे मतदान करण्याबाबतचे स्टिकर्स वितरित करणे, मॅरेथॉन स्पर्धा सायकल रॅली स्पर्धा घेण्यात आल्या.

त्याचबरोबर पीएमपीएमएल बस, रिक्षावर स्टिकर्स लावणे, रेडिओवर जाहिरात करणे, वृत्तपत्रे, सोशल मीडिया, ऑडिओ, व्हिडिओ किल्प, स्थानिक केबलद्वारे जाहिरात करण्यात आली. तसेच स्काय बलून, एलईटी स्क्रिन यांच्यामार्फत प्रचार करून मतदार जनजागृती करण्यात आली होती.

या जनजागृतीसाठी ८१ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव ११ जानेवारी २०१७ रोजी आयुक्तांची मान्यता घेऊन स्थायी समोर ठेवला होता. या खर्चास ११ मे २०१७ रोजी स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यानच्या कालावधित राज्य निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने विविध अतिरिक्त उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. त्यासाठी मंजूर खर्चाव्यतिरिक्त ९१ लाख १७ हजार ७६० रुपये इतका वाढीव खर्च झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.