ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विनापरवाना मंडप उभारणा-यांवर कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा

चिंचवड, दि. २४ - पिंपरी-चिंचवड शहरात गणेश मंडळांनी विनापरवाना मंडप उभारल्यास ते बेकायदेशीर ठरवून त्यावर तातडीने कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच विनापरवाना मंडप उभारणा-या मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. शहरात हजारो गणेश मंडळे आहेत. त्यातील मोजकीच मंडळे महापालिका तसेच पोलीस प्रशासनाची परवानगी घेतात. तर, काही मंडळे परवानगी घेताच बेकायदेशीर पद्धतीने रहदारीच्या रस्त्यावर पत्रा शेड मारून मंडप उभारतात. मात्र, यावर्षी कोणत्याही गणेश मंडळांना नियमभंग केल्यास सुटका मिळणार नाही. अशा गणेश मंडळांचे पत्राशेड, डेकोरेशन, कमानी तपासण्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी तपासणी अधिका-यांच्या नियंत्रणाखाली पथक नेमले आहे.

या पथकाद्वारे वाहतुकीला अडथळा ठरणा-या पत्राशेड डेकोरेशनची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अशा गणेश मंडळांच्या पदाधिका-यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाद्वारे मंडप हटवण्याचीही कारवाई केली जाणार आहेत, असे आदेशच आयुक्त हार्डीकर यांनी प्रभाग अधिका-यांना दिले आहेत.

गणेशोत्सवात मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांनी पोलिसांची तसेच महापालिकेची परवानगी घ्यावी, परवानगी घेण्यासाठी उद्या गुरूवार (दि. 24) पर्यंत मुदत आहे. परवानगी प्राप्त करण्यासाठी www.punepolice.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.