ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तळेगाव-चाकण रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

तळेगाव, दि. २६ - तळेगाव-चाकण रस्ता नादुरुस्त असल्याने रस्त्यावर मोठ्या स्वरूपाचे अपघात होत आहेत. यापुढे देखील अपघातांचे सत्र सुरूच राहिल्यास नागरिकांचा संताप अनावर होऊन आंदोलन होण्याची शक्यता तळेगाव दाभाडे पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबत तळेगाव पोलिसांनी मावळ तालुका तहसीलदारांना निवेदन देखील दिले आहे.

तळेगाव-चाकण रस्त्यावर अपघातांची संख्या वाढत असून रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे. रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुशील सैंदाणे, मावळ मित्र जनआंदोलन समितीचे राजेंद्र जांभूळकर आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर यांनी दिला आहे. आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता तळेगाव दाभाडे पोलिसांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात वर्तविली आहे.

तळेगाव-चाकण रस्ता पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा असल्याने हा रस्ता कायम रहदारीचा आहे. चाकण एमआयडीसी ते मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. त्याचबरोबर याच रस्त्यालगत शाळा, महाविद्यालये, गॅस एजन्सी, भाजी मंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन, दवाखाने, बाजारपेठ अशा प्रकारची वर्दळीची ठिकाणे आहेत.

तळेगावचा मध्यवर्ती रस्ता म्हणून ओळख असलेल्या या रस्त्याला जणू कुणाची दृष्ट लागावी अशी परिस्थिती उद्भवली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळा सुरू असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरते. पाणी भरलेले खड्डे चुकविताना चालकांची होणारी दमछाक हे दृश्य बघण्यालायक झाले आहे. वाहन चालक कितीही सराईत असला तरी त्याचे वाहन चालविण्याचे कौशल्य इथे कसलेच कामी येत नाही.

तळेगाव-चाकण रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासन कामाला लागले असून त्यांनी मावळ बांधकाम विभाग, पुणे जिल्हा बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिका-यांना तोंडी, फोनद्वारे, लेखी निवेदने, अर्ज आणि विनंत्या वारंवार करून देखील रस्ता दुरुस्त करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. या रस्त्यावर नेहमी ट्राफिक जाम असलेले बघायला मिळते.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. जानेवारी २०१६ ते जुलै २०१७ या Posted On: 26 August 2017