ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताला नगरसेवकांनी उपस्थित राहण्याची मागणी

चिंचवड, दि. २८ - पिंपरी-चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेच्या वेळी काही नगरसेवक 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत संपल्यानंतर सभागृहात येतात. सर्व नगरसेवकांनी राष्ट्रगीत सुरू असताना उपस्थित रहावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग प्रचंडराव यांनी केली आहे.

याबाबत सभागृह नेते एकनाथ पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेवर निर्विवाद सत्ता असताना भाजपच्याच काही नगरसेवकांकडून देशाच्या राष्ट्रगीताचा अवमान होत आहे. एकीकडे राष्ट्रगीतासाठी केंद्रातील मंत्री आग्रह धरताना दिसतात. तर, दुसरीकडे पालिकेतील भाजपचेच काही नगरसेवक सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीत सुरू होताना उपस्थित नसतात.

राष्ट्रगीत संपल्यानंतर हे नगरसेवक सभागृहात येतात. यामुळे राष्ट्रगीताचा एकप्रकारे अवमान केल्यासारखे आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना राष्ट्रगीतासाठी उपस्थित रहाण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी परचंडराव यांनी निवेदनातून केली आहे.