ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

माथाडी कामगारांना लवकरच अल्प दरात घरे देणार - इरफान सय्यद

चिंचवड, दु. २९ - मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कामगारांना घरे आहेत. परंतु, देशभरात औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कामगारांना घरे नव्हती. कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होती. त्याला आता यश मिळत आहे. लवकरच माथाडी कामगारांना अल्प दरात स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी दिली.

आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात रविवारी (दि.२७) मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना सय्यद बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, योगिता नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे, शिवसेनेच्या शहर संघटिका सुलभा उबाळे, मनोहर भिसे, किसन बावकर, परेश मोरे, नितीन धोत्रे, प्रमोद शेलार, मारुती कौदरे, भिवाजी वाटेकर, अप्पा मुजुमले, रघुनंद घुले, खंडू गवळीपांडुरंग कदम, गोरक्ष दुबाले, बाबासाहेब पोते, परमेश्वर मुळे, अशोक साळुंखे, जसबिर राणा, खंडु थोरवे, मुरली कदम, हनुमंत शिंदे, वनदेव खामकर, नितीन कदन, सतिश कंटाळे, अशोक देवकाते  आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र मजदूर संघटना असंघटितांसाठी काम करत आहे. इतर संघटनांपेक्षा महाराष्ट्र मजदूर संघटनेची ध्येय-धोरणे वेगळी आहेत. माथाडी कामगारांना स्वत:चे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. त्याला आता यश मिळत आहे. लवकरच माथाडी कामगारांना अल्प दरात स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कामगारांना अल्प दरात घर उपलब्ध करुन देणारी राज्यातील एकमेव संघटना असणार आहे, असे इरफान सय्यद  म्हणाले.

पतसंस्थेचे संस्थापक मनोहर भिसे म्हणाले, पूर्वी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविताना खूप अडचणी येत होत्या. आता इरफान सय्यद Posted On: 29 August 2017