ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्नाटक पंचायतीच्या पदाधिका-यांनी घेतली लिकेच्या प्रकल्पांची माहिती

चिंचवड, दि. ३० - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील टाऊन पंचायत नगमंगला येथील नगरसेवक अधिकारी यांनी पालिकेला भेट दिली. त्यांचे स्वागत कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

सहआयुक्त यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांबाबतचा माहिती पट अभ्यास दौरा पथकास दाखवण्यात आला. तसेच, चित्रफितीद्वारे घरपट्टी पाणीपट्टी आकारणी बाबतची सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली. या अभ्यास दौ-यातील सदस्यांनी निगडी येथील जलशुद्धी केंद्र (स्काडा प्रकल्प), या प्रकल्पासह शहरातील विविध प्रकल्पांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. 

या अभ्यास दौ-यामध्ये स्थायी समिती सभापती रागव्हेंद्र, सभापती विजय कुमार, उपसभापती एन. जे. चंद्रा, नगरसदस्य एन. के. जयकुमार, मंजम्मा, डी. गीथा, बी. आर. भासकर, एन. राजेश्वरी, एन. टी. राजा, भाग्या, शिला, महालक्ष्मी, एन. के. गिरिश, परविण ताज, नूर अहमद, अनवर पशा, स्वीकृत सदस्य प्रवीण कुमार, रमेश, जाफर शरिफ आदींचा समावेश होता.