ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टाकाऊ वस्तूंपासून बनविला ऐतिहासिक महाल

चिंचवड, दि. ३१ - येथील केशवनगर, काकडे पार्कमध्ये असलेल्या भक्ती रेसिडेन्सीत सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने कागद, लाकूड, थर्माकोल यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करतऐतिहासिक महलहा देखावा साकारला आहे. भक्ती रेसिडेन्सीचे गणेशोत्सवाचे यंदाचे दहावे आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजात दिला जावा, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यातील संपूर्ण डिझाईन इतर कलाकुसर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत: केली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने यंदा मंडळाच्या वतीने २७ रोजी रक्तदान दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन नगरसेवक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिरासाठी विद्याश्री चॅरिटेबल ट्रस्ट तर दंतचिकित्सा शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात ५६ बाटल्या रक्त संकलित झाले. त्याचप्रमाणे दंतचिकित्सा शिबिरात १३० जणांची तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभल्याने पिंपरी-चिंचवड रक्तपेढीतर्फे सोसायटीला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रितेश भुसारी, उपाध्यक्ष श्रेयस बाबू, खजिनदार अभिजित जाधव, कार्यकर्ते निखिल जाधव, विवेक पालांडे, विनोद खोत, सौरभ फाटक, सार्थक शूल, अनिकेत खोत, आमिर तांबोळी, संकेत यादव, अंकूर शहा, रुपेश मगर, शुभम चव्हाण, अनिकेत पाटील, शुभम सस्ते, विनायक कुरी, योगेश अपिष्टे, संजय लोंढे, नकूल लोंढे, अनिरुद्ध पाटील यांनी परिश्रम घेतले.