ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अडीच हजार मूर्तीदान

चिंचवड, दि. १ - नदीचे प्रदूषण  रोखण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान, टाटा मोटर्स (पिंपरी) टाटा व्हालटेअरिंग ग्रुपतर्फे राबविण्यात येत असलेल्या मूर्तीदान  उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत अडीच हजार  गणेशमूर्ती दान करण्यात आल्या.

गणेश मंडळांसह मोठ्या प्रमाणात घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना होते. भक्तिमय वातावरणात दीड, पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अनंत चतुर्थी दिवशी पाण्यात विसर्जन केले जाते. काही वर्षापूर्वी केवळ शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याने विर्सजनानंतर त्या पाण्यात विरघळतात.  मात्र, कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविण्यास सुरुवात झाल्याने त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मूर्तीची विटंबना  होते
टाटा मोटर्सने मूर्तीदान  हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम वाल्हेकरवाडी, थेरगाव, मोरया गोसावी केशवनगर, काळेवाडी आदी घाटांवर राबविण्यात येत आहे. गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत अडीच हजार  गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. दान केलेल्या मूर्ती हिंजवडी रोड, विनोदवस्तीजवळ असलेल्या तळ्यात विर्सजनासाठी नेल्या जातात. त्याठिकाणी पूजा-आरती केल्यानंतर व्यवस्थित तळ्यात विसर्जित केल्या जातात