ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पारदर्शक कारभाराच्या नावाखाली पालिकेत अनागोंदी व हुकूमशाही - योगेश बहल

चिंचवड, दि. २ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट सत्ताधा-यांनी घातला आहे. स्वत: विकास कामे करावीत आणि नावे बदलावित. दुस-याने केलेल्या विकासकामांचे नाव बदलण्याचा सत्ताधा-यांना कोणी अधिकार दिला आहे. नाव बदलण्याचा घाट म्हणजे सूडाचे राजकारण आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. तसेच भाजपचे पदाधिकारी स्वच्छ पारदर्शक कारभाराच्या नावाखाली अनागोंदी हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत, असेही बहल म्हणाले.

पालिका मुख्यालयात योगेश बहल यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जुन्या प्रकल्पाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे. संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय सभेत ठेवला आहे. भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झाले. पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराचा अनुभव आपण घेत आहोत. केवळ ठेकेदारांकडून वसुली सुरू आहे. मनमानी आणि हुकूमशाहीपद्धतीने काम सुरू आहे. टक्केवारीचे राजकारण सुरू आहे

गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने या शहराचा कायापालट केला. मात्र, जुन्याच प्रकल्पांची पुन्हा उद्घाटने गैरपद्धतीने केली जात आहेत. श्रेय लाटले जात आहे. संत तुकारामनगर परिसरात काम करीत असताना भाजपाचे वसंत शेवडे यांनी नगरसेवक असताना विकास कामे केली. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय शाळा, बी. डी. किल्लेदार उद्यान, जनरल अरुणकुमार वैद्य अग्निशामक दल अशी विविध प्रकल्पांना नावे दिली. या भागाचे नेतृत्व आपण गेली पंचवीस वर्षे करीत असताना कधी विरोधकांनी तयार केलेल्या प्रकल्पांची नावे बदललेली नाही. सुडाचे राजकारण करायचे असते तर मी करू शकलो असतो. पालिकेतील सर्व महत्वाच्या पदावर मी होतो. परंतु, आम्हाला सुडाचे राजकारण करायचे नाही. दुस-याच्या कामाचे श्रेय घेणे योग्य नाही, असेही बहल म्हणाले

पालिका सभागृहाचे कामकाज नियमांप्रमाणे चालत नाही. ते सभाशास्त्राच्या नियमानुसार आणि लोकशाही पद्धतीने चालू ठेवणे गरजेचे आहे. परंतु सभागृहात बोलू दिले जात नाही. नवोदित नगरसेवकांनाही अं