ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

निगडी येथे केरळी बांधवांचा ओणम सण उत्साहात साजरा

निगडी, दि. ४ - पुणे शहरात भारतातील विविध शहरांमधील लोक गुण्या गोविंदाने वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे भारतातील जवळपास सर्व सण-उत्सव पुणे पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरे करण्यात येतात. आज, (सोमवारी) निगडी प्राधिकरण परिसरात केरळी लोकांचा पवित्र सण 'ओणम' उत्साहात साजरा करण्यात आला.

निगडी प्राधिकरण भागात केरळी लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ओणमचा उत्सव निगडी भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ओणम केरळचा प्रमुख उत्सव आहे. महिलांनी निगडी येथील कृष्ण मंदिरात आकर्षक रांगोळी काढून उत्सवाची सुरुवात केली. तसेच प्रसाद म्हणून खीर वाटण्यात आली.

ओणम उत्सवाविषयी एक आख्यायिका आहे की, सम्राट महाबली हा केरळचा समृद्ध राजा होता. तो खूप दानधर्म करीत असे. खुद्द भगवान विष्णूला सम्राट महाबलीचा मत्सर वाटू लागल्याने विष्णूने वामनाचा अवतार घेऊन महाबलीकडे तीन पावले जागा मागितली. सम्राट महाबलीने त्याची इच्छा पूर्ण करण्याची परवानगी दिली. वामनाने दोन पावले टाकली परंतु तिसरे पाऊल टाकण्यासाठी जागा नसल्याने महाबलीने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास संगितले. वामनाने तिसरे पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेऊन त्याला धर्तीवरून गायब केले. त्यावेळी महाबलीने वामनाकडे एक इच्छा व्यक्त केली; ती म्हणजे वर्षातून एक वेळ आपल्या प्रजेला भेटण्यासाठी आपल्याला येता यावं. वामनाने ही इच्छा मान्य केली. तेव्हापासून वर्षातून एक वेळ सम्राट महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी येतात. तो दिवस केरळी लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात.

बाहेरील प्रांतामध्ये राहणारे केरळी बांधव या उत्सवासाठी केरळ राज्यात आपल्या गावी जाण्यासाठी आतुर असतात. ओणमच्या माध्यमातून केरळच्या बहुढंगी संस्कृतीला जाणून घेण्याची संधी मिळते.