ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विसर्जनासाठी असणार दोन हजार पोलिसांचा फौजफाटा

चिंचवड, दि. ५ - पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या (मंगळवारी) होणा-या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी  दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.  यासाठी परिमंडळ तीनमध्ये येणा-या २८ घाटावर  ११२ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, उद्याच्या मिरवणुकीसाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून परिमंडळ तीनच्या हद्दीत एक पोलीस उपायुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ९९ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, एक  हजार ५०० पोलीस कर्मचारी यासह होमगार्ड, राखीव दल, दंगा काबू नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक नाशक पथक असा सुमारे एक  हजार ७०० पोलीस तसेच पोलीस मित्र, समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक, एनएसएसचे जवान यांचीही मदत घेतली जाणार आहे. याबरोबरच गर्दीच्या तसेच संवेदनशील ठिकाणी सतत मोबाईल व्हॅन गस्तीवर असणार आहे. तसेच शहराच्या सर्व घाटांवर ११२ सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. गर्दीच्या चौकात पोलीस कक्ष उभारण्यात येणार आहेत 

याबरोबरच नागरिकांनीही अफवा पसरवु नयेत तसेच महिलांनी दागिने लहान मुलांची काळजी घ्यावी, शांतता सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.