ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुढच्या वर्षी लवकर या'च्या घोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप...

चिंचवड, दि. ६ - ढोल-ताशांचा निनाद... गणपती बाप्पा मोरया... एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार", 'गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या' ... असा अखंड जयघोष... आणि  भंडा-याची, फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. यावर्षी  मिरवणुकीमध्ये  प्रत्येक मंडळाने पारंपरिक आणि ढोल ताशांचा वापर केला. दुपारी  अडीच वाजता सुरूवात झालेली मिरवणूक रात्री साडेबारा वाजता म्हणजे तब्बल दहा तास चालली. रात्रीबारापर्यंत ४८ मंडळांनी, तर १२ नंतर मंडळांनी विसर्जन केले. मिरवणूक  पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

चिंचवड, चापेकर चौकात महापालिका, पोलिसांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, अतिरीक्त आयुक्त अच्चुत हांगे,  नगरसेविका अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, मोना कुलकर्णी, करुणा चिंचवडे,  नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, सह आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.

वेताळनगर येथील शिवतेज स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सव्वा दोन वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. तर सायंकाळी सव्वा सात पर्यंत १३ गणेश मंडळाच्या मिरवणूका घाटाकडे रवाना झाल्या होत्या. त्यानंतर एका तासाने सव्वा आठच्या सुमारास बाल तरुण मंडळाची मिरवणूक चौकात दाखल झाली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ चिंचवडचा राजा मंडळाची मिरवणूक आली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी Posted On: 06 September 2017