ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लेझर शोतून ‘स्मार्ट सिटी’ची माहिती, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

चिंचवड, दि. ७ - महापालिकेच्या पिंपरी-चिंचवड फेस्टिवलमध्ये 'स्मार्ट सिटीची माहिती, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गणपतीची प्रतिकृती तयार करून बाप्पाच्या मुखातून गणेशभक्तांना, ‘तुम्ही आता लवकरचस्मार्ट सिटीचेस्मार्टनागरिक होणार आहात. 'परिसरात स्वच्छता राखा', 'प्रदूषण टाळा', 'प्रत्येक घरी शौचालय बांधा' असा पर्यावरणाविषयी जनजागृती करणारा अनोखा संदेश देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवानिमित्त नुकताच पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. फेस्टिव्हलमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येलास्मार्ट सिटीवर आधारित रणजित इंगळे यांच्या शब्द क्रिएशन प्रस्तुत लेझर शो हा मुख्य आकर्षण ठरला. 'स्मार्ट सिटी'ची माहिती, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा संदेश या लेझर शोद्वारे देण्यात आला. 

पिंपरी-चिंचवड शहराचा झालेला विकास. तसेच शहराच्या वैभवात भर घालणारे भक्ती-शक्ती उद्यान, दुर्गा टेकडी, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, क्रीडांगणे, कुस्ती प्रशिक्षण केंद्र, वायसीएम, स्वस्त घरकुल योजना, याबरोबरच बर्ड व्हॅली, गणेश तलाव, स्वच्छ पाण्यासाठी स्वतंत्र प्रणाली, नाट्यगृहे, इतिहासाची साक्ष देणारे शिवशक्ती स्मारक, चापेकर बंधू स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, रस्ते, ग्रेडसेपरेटर, तसेच डायनासॉर पार्क, बीआरटीएसची वाहतूक व्यवस्था, बास्केट ब्रीज, बोट क्लब, संगीत अकादमी, स्वरसागर महोत्सव, मलशुद्धीकरण प्रकल्प, हॉकी पॉलिग्रास मैदान, ‘स्मार्ट सिटीचा उद्देश या बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तसेच मेट्रो शहरातील विकास प्रकल्पांचा लेझर शोच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती देताना शब्द क्रिएशन प्रस्तुतचे रणजित इंगळे म्हणाले की, आतापर्यंत विविध ठिकाणीस्मार्ट सिटीवर आधारित अनेक सादरीकरण करण्यात आली. परंतु, अशा प्रकारेस्मार्ट सिटीची माहिती देणारा हा पहिलाच लेझर शो आहे. या शोद्वारे नागरिकांना गणेशोत्सवाचे महत्त्व, पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘स्मार्ट सिटीम्हणजे काय ही संकल्पना लोकांना कळावी या हेतूने हा शो तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.