ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुणे-मुंबई लोहमार्गावरील अप व मिडल लाईन सुरु, डाऊन लाईन बंदच

चिंचवड, दि. ८ - खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने विस्कळीत झालेली मुंबई-पुणे लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे. मालगाडीचे घसरलेले सहा डबे हटवण्याचे काम अद्यापही सुरू असून रात्रभर युद्धपातळीवर केलेल्या कामानंतर मुंबई पुणे दोन्ही बाजुकडे जाणारी मिडल लाईन मुंबईकडे जाणारी अप लाईन सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. नुकतीच सकाळी साडेसात वाजता सिंहगड एक्सप्रेस नांदेड एक्सप्रेस येथून मुंबईकडे रवाना झाली. मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वेचे रुळ स्लिपर खराब झाल्याने तसेच विजेचे खांब पडल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी डाऊन लाईन अद्याप पूर्णतः बंद आहे.

डाऊन लाईन सुरू करण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. डाऊन लाईन सुरू झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी यंत्रसामुग्री घटनास्थळी असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या अप मिडल लाईन सुरू झाल्याने वाहतूक सुरू झाली असली तरी दोन्ही बाजूने रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.