ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडून योगेश्वरला लग्नात अनोखं गिफ्ट!

चंदीगड: लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लग्नबंधनात अडकला आहे. हुंड्याच्या प्रथेला फाटा दिल्याने योगेश्वर आधीपासूनच चर्चेत आहे. योगेश्वरने शुभशकून म्हणून केवळ एक रुपये हुंडा स्वीकारुन देशवासियांची मनं जिंकली.

दरम्यान, योगेश्वर आणि हरियाणातले काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची लेक शीतल शर्मा यांचा सोमवारी विवाह झाला.

प्रथा झुगारुन शकुनाचा एक रुपया हुंडा, योगेश्वर दत्त बोहल्यावर

या विवाहसोहळ्याला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यापासून सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरील लावली.

व्हीआयपींची हजेरी

योगेश्वर – शीतलच्या लग्नाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी उपस्थित होते.

याशिवाय हरियाणातील आपचे नेते नवीन जयहिंद हे सपत्नीक हजर होते.

मुख्यमंत्र्याकडून अनोखं गिफ्ट

लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी योगेश्वर दत्तला अनोखं गिफ्ट दिलं. खट्टर यांनी योगेश्वरच्या गावाच्या विकासकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

योगेश्वरने देशाचं नाव उंचावलं आहे. त्यामुळे त्याच्या गावकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात, असं मुख्यमंत्री म्हणाले. गावात महाविद्यालय सुरु करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

गावभर लग्नाची धावपळ

योगेश्वरच्या भैंसवाल या गावातही लग्नाचा उत्साह होता. लग्नाचे सर्व विधी याच गावात पूर्ण झाले.

कोण आहे मिसेस योगेश्वर दत्त?

कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना धोबीपछाड देणाऱ्या योगेश्वरला, शीतल शर्माने ‘चीत’ केलं.  शीतल ही हरियाणा काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची एकुलती एक मुलगी आहे. योगेश्वरचे वस्ताद सतबीर यांनी हे लग्न जमवल्याचं सांगण्यात येतं.