ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

सिडनी : भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आलाय. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या कांगारूंच्या संघात अनुभवी ऑफ स्पिनर नॅथन लायनवर फिरकी माऱ्याची जबाबदारी राहील.

 लायनच्या साथीने अॅश्टन अॅगर आणि स्टीव्ह ओकीफी हे दोन डावखुरे फिरकी गोलंदाज आणि नवोदित लेग स्पिनर मिशेल स्वेपसनलाही ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालं आहे. त्याशिवाय अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलनेही तब्बल दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन केलंय.

 23 फेब्रुवारीला पुण्यातील कसोटीने या मालिकेची सुरूवात होणार आहे. या मालिकेतील उर्वरीत कसोटी बंगळुरू, रांची आणि धर्मशालामध्ये खेळवल्या जातील.

 ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन अॅगर, जॅक्सन बर्ड, पीटर हॅड्सकोंब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नाथन ल्योन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव ओकीफी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर)