ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव, रक्कम ऐकल्यानंतर हैराण झाली मरिन

नवी दिल्ली : बॅडमिंटन विश्वातील नंबर वन महिला कॅरोलिना मरिन सध्या बॅडमिंटन प्रीमियर लीगच्या निमित्ताने भारतात आलीये. रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये मरिनने सिंधूला हरवत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतरही मरिनपेक्षा सिंधूनेच सर्वांचे मन जिंकले. 

सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर विविध स्तरातून तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. सिंधूला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम ऐकून मरिनही हैराण झालीये. 

स्पेनमध्ये असे काही घडत नाही. इथे सगळ वेगळं आहे. मी सुवर्ण जिंकले तर सिंधूने रौप्य. मात्र मला हे ऐकून आश्चर्य वाटले की तिच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव झाला. मलाही सुवर्णपदक जिंकल्यानंतर बक्षिस म्हणून काही रक्कम मिळालीये. मात्र त्याची तुलना सिंधूच्या रकमेशी केली जाऊ शकत नाही. मला मिळालेली रक्कम सिंधूला मिळालेल्या रकमेच्याजवळही जाणार नाही. 

रिओमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरिनला त्यांच्या सरकारकडून ९४००० युरो(साधारण ६८ लाख रुपये) मिळालेत. तर दुसरीकडे सिंधूला तब्बल ६५ कोटींचे बक्षिस मिळालेय. 

मरिन पुढे म्हणाली, खरंच येथे येऊन मला चॅम्पियन असल्याचे जाणवतेय. भारतात खेळाडूंना मोठा सन्मान मिळतो. मला भारतात जितकी प्रसिद्धी मिळाली तितकी कुठेच नाही.