ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रथा झुगारुन शकुनाचा एक रुपया हुंडा, योगेश्वर दत्त बोहल्यावर

नवी दिल्ली : लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विशेष म्हणजे योगेश्वरनं हुंडा नाकारुन नवा आदर्श घातला आहे. शुभशकुन म्हणून केवळ एक रुपये हुंडा स्वीकारण्याचा पायंडा योगेश्वरने घातला आहे.

हरियाणातले काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची लेक शीतल शर्मा हिच्यासोबत योगेश्वरचा साखरपुडा शनिवारी संपन्न झाला. सोमवारी या दोघांच्या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुलींच्या लग्नासाठी आईवडिलांना करावी लागणारी पैशाची जुळवाजुळव मी पाहिली आहे. त्यामुळे मोठं होतानाच मी दोन निर्णय घेतले. एक म्हणजे मी कुस्तीत देशाचं नाव रोशन करणार आणि दुसरं म्हणजे हुंडा स्वीकारणार नाही. पहिलं स्वप्न आधीच साकार झालं होतं, आता दुसरं होतंय, असं योगेश्वर म्हणाला.

शुभशकुन म्हणून योगेश्वरच्या कुटुंबीयांनी साखरपुड्यात केवळ एक रुपयाचं नाणं स्वीकारलं. नातेवाईकांना याव्यक्तिरिक्त कोणतंही गिफ्ट देऊ नका, अशी विनंती त्याने केली आहे. काही जणांनी मात्र एक रुपया तरी का स्वीकारला, असे बोचरे सवाल त्याला ट्विटरवर विचारले आहेत.