ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रीय थायबॉक्‍सिंग स्पर्धेसाठी १८ खेळाडूंची निवड

>> पिंपरी-चिंचवडमध्ये फेब्रुवारीत होणार स्पर्धा 

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) - राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर देशात प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय थायबॉक्‍सिंग स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये राज्यातून १८ खेळाडूंची निवड झाल्याची माहिती थायबॉक्‍सिंग संघटनेचे अध्यक्ष आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली. 

निगडी येथील मीनाताई ठाकरे हॉलमध्ये या स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींची नावे (कंसात शाळेचे नाव) - ४६ किलो गट - प्रांजल बाबानगर (बिना इंग्लिश मिडियम स्कुल, आकुर्डी), ४८ किलो गट - साक्षी डावरे (अगस्ती महाविद्यालय, अकोले, अहमदनगर), ५० किलो गट - साबीया पाशा आत्तार (संचेती विद्यालय, थेरगाव), ५२ किलो गट - जशोदा सोनवेण (श्री राजस्वान कन्या विद्यालय, गोंदिया), ५४ किलो गट - ऋतुजा सुर्वे (माऊंट रोड ऍडस्‌ स्कूल, तळेगाव) ५७ किलो गट - गौरी गागरे (प्रियदर्शनी कॉलेज. अहमदनगर), ६० किलो गट - रुपाली पाटील (के. बी. पी. कॉलेज, इस्लामपूर), ६५ किलो गट - ऋतूजा शिंदे (राजेंद्र कॉलेज, खंडाळा, कोल्हापूर), ७० किलो गट - सृष्टी चव्हाण (हुजुरपागा विद्यालय, पुणे).
 
मुलांची नावे - ४८ किलो गट - राकेश चौधरी (ज्ञानदीप स्कूल, वाई), ५१ किलो गट - जुनैद शेख (एम. एम. विद्यालय, काळेवाडी), ५४ किलो गट - अमित कान्हे, ५७ किलो गट - ओमकार खाकोळ (न्यू आर्टस कॉलेज, अहमदनगर), ६० किलो गट - प्रसाद राजपुरे (किसनराव महाविद्यालय, वाई), ६४ किलो गट - आदित्य सावंत (चिल्ड्रन्स ऍकॅडमी मालाड, मुंबई), ६९ किलो गट - हर्षल पाटील (कै. बा. द. पगारे कॉलेज, नाशिक), ७५ किलो गट - रिशान अहमद (एस. एम. पटेल कॉलेज, गोंदिया), ८१ किलो गट - स्वप्निल पाटील (बिर्ला कॉलेज, कल्याण, मुंबई).