ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सिंधू, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

लखनौ, दि. २६ (प्रतिनिधी) - रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने अनुरा प्रभुदेसाई आणि गतविजेत्या श्रीकांतने लखानी सारंगचा अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत पराभव करीत सय्यद मोदी ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सिंधूने आपल्याच देशाच्या प्रभूदेसाईला सरळ दोन सेटमध्ये 21-9, 21-11 असे पराभूत केले. तिसर्‍या मानांकित श्रीकांतने गुडघ्यातील दुखापतीनंतर पुनरागमन केले. त्याने पहिल्याच सामन्यात लखानीचा 25-21, 21-7 आणि 21-14 ने पराभव केला. आता त्याचा सामना मलेशियाच्या जुल्हेल्मी जुल्कीफ्ली याच्याविरुद्ध होईल. जुल्हेल्मीने सचिन रावतचा पराभव केला आहे. 2016 चा स्विस ओपनचा विजेता असलेल्या प्रणयने एनवीएस विजेत्याचा 21-11, 21-9 ने पराभव केला. नवव्या मानांकित प्रणिथने आदित्य जोशीला 21-14, 21-9 ने पराभूत केले.

चिनी ताईपेचा चॅम्पियन 11व्या मानांकित सौरभने राहुल यादव चित्ताबोईनाचा 21-11, 21-17 ने पराभव केला. जगातील 15वा मानांकित डेन्मार्कचा हंस क्रिस्टियन विटिंगघसने भारताच्या मुनावर मोहम्मदचा 21-11, 21-13 ने पराभव केला. महिला गटात, पॉलिश ओपनची विजेती रितुपर्णा दासने नेपाळच्या नांगसाल तमांगचा 21-5, 21-6 ने पराभव केला.