ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राहुल द्रविडने नाकारली डॉक्टरेट

बंगळुरू, दि. २५ (प्रतिनिधी) - डॉक्टरेट पदवी मिळणं हे सन्मानाचं प्रतिक मानलं जातं. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यास दुसर्‍यांदा नकार दिला आहे. २७ जानेवारी रोजी बंगळुरू विद्यापिठाकडून द्रविडला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती. मात्र, क्रीडा क्षेत्रात स्वतः संशोधन करून ही पदवी मिळवेल असं म्हणत द्रविडने ही पदवी घेण्यास नकार दिला. 

बंगळुरू विद्यापिठाने २७ जानेवारी रोजी होणार्‍या ५२ व्या दिक्षांत समारंभात अशी राहूल द्रविडला डॉक्टरेट पदवी देण्याचं जाहीर केलं होतं. याबाबत विद्यापिठाचे कुलगुरू बी थिमे गौड़ा म्हणाले, द्रविडला आम्ही डॉक्टरेट पदवी देण्याचं जाहीर केलं होतं, त्याबाबत द्रविडने आमचे आभार मानले मात्र, क्रीडा क्षेत्रात स्वतः संशोधन करून ही पदवी मिळवेल असं म्हणत त्याने पदवी घेण्यास नकार दिला.  

यापूर्वीही द्रविडने डॉक्टरेट पदवी घेण्यास नकार दिला होता. २०१४ साली गुलबर्गा विद्यापिठाकडून ३२ व्या दिक्षांत समारंभात त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता.