ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फिटनेस ट्रेनर राजेश सावंत यांचा संशयास्पद मृत्यू

मुंबई, दि. २९ - भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. झोपेतच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. यासंबंधीत मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

राजेश सावंत सकाळी सराव सत्रासाठी न आल्याने चौकशी केली असता मुंबईत ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते, त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.

भारतीय अंडर-19 क्रिकेट संघ उद्यापासून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. वानखेडेवर उद्यापासून या मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेत पाच वन डे आणि दोन चार दिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

राजेश सावंत यांचा प्रशिक्षक म्हणून नुकत्याच झालेल्या इराणी चषकातही सहभाग होता. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध क्रिकेट संघांमध्ये प्रशिक्षक म्हणून कर्तव्य बजावलं आहे. तसेच ते अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकही होते.