ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

‘युवोत्सव’ क्रीडा स्पर्धेत फुटबॉल, बास्केटबॉलच्या स्पर्धांचे सामने

पिंपरी, दि. ३१ - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डीतील एस.बी.पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात आंतरमहाविद्यालय क्रीडा स्पर्धांचे एक ते तीन फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक डॉ. डॅनिअल पेनकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

मागील तीन वर्षांपासून होत असलेल्या ‘युवोत्सव’ क्रीडा स्पर्धेत फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या स्पर्धांमध्ये ४४ संघ सहभागी होणार आहेत. याचे उद्‌घाटन डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते आणि संस्थेचे विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. डॅनिअल पेनकर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.१ फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजता संस्थेच्या क्रिडांगणावर होणार आहे बक्षिस वितरण समारंभ शुक्रवारी (दि. ३ फेब्रुवारी) महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघांचा माजी कर्णधार मिलिंद गुजांळ याच्या हस्ते होणार आहे. यावेळी विजेत्या संघांना रुपये ५१ हजारांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.