ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

प्रशासकीय पॅनलचा बीसीसीआयला दणका

दिल्लीतील कार्यालयाला टाळं; कर्मचार्‍यांनाही हटविले
नवी दिल्ली, दि. 6 - गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या नव्या प्रशासकीय पॅनलने बीसीसीआयचं दिल्लीतलं कार्यालय बंद केलं आहे, तसंच बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांच्या कार्यालयालाही आज टाळं ठोकण्यात आलं.
 
या दोन्ही कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयसाठी प्रशासकीय पॅनलची घोषणा केली होती. कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांना पॅनलचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. पॅनलमध्ये 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. लोढा समितीच्या शिफारशी मानण्यास नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवलं होतं.