ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

दणदणीत शतक झळकावून विजय माघारी

हैदराबाद, दि. ९ - बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत टीम इंडियाचा सलामीवीर मुरली विजयने दणदणीत शतक झळकावलं आहे.

विजयने 149 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. विजयचं हे कारकिर्दीतील नववं तर बांगलादेशविरुद्धचं दुसरं शतक आहे. तर त्याचं भारतातील सहावं आणि हैदराबादमधील दुसरं शतक आहे. विजय 159 चेंडूत 108 धावा करुन माघारी परतला.

या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर के एल राहुलला या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तो अवघ्या 2 धावा करुन माघारी परतला. टस्किन अहमदने त्याला क्लीन बोल्ड केलं. राहुल बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती 1 बाद 2 अशी होती.

त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. पुजारा- मुरली विजय जोडीने टिच्चून फलंदाजी करत, धावफलक हालता ठेवला. दोघांनी आपआपली अर्धशतकं पूर्ण केली.

दोघांची शतकाकडे वाटचाल सुरु होती, त्यावेळी मेहदी मिराझच्या गोलंदाजीवर पुजारा बाद झाला. पुजाराने 177 चेंडूत 83 धावा केल्या. पुजारा- मुरली विजयने दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 178 धावांची भागीदारी रचली.

पुजारा बाद झाल्यानंतर मुरली विजयच्या साथीला विराट कोहली आला. या दोघांनी पुन्हा धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मुरली विजयने त्याचं शतक पूर्ण केलं.

शतकानंतर हात खोलण्याच्या तयारीत असलेला विजय तैजुल इस्लामच्या गोलंदाचीवर चकला आणि क्लीन बोल्ड झाला.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news