ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बास्केटबॉल स्‍पर्धेत आयएमइडी महाविद्यालयाचा विजय

आंतरमहाविद्यालयीन युवोत्‍सव-२०१७ मध्ये १६ संघांचा सहभाग

पिंपरी, दि. १३ - बास्केटबॉलच्या अतितटीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड आंत्रेपेनरशिप डेव्हलप्मेंट महाविद्यालयाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेजचा संघावर विजय मिळवला. निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात तीन दिवसीय 'युवोत्‍सव - २०१७' या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. अरविंद बी. तेलंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्‍ते करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्‍हयातील १६ संघ सहभागी झाले होते. सर्व विजेत्‍या संघास आणि सर्वोकृष्ट खेळाडुंना महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍टचे विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. डॅनियल पेणकर, डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते.

प्रथम क्रमांक विजेता संघ - इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड आंत्रेपेनरशिप डेव्हलप्मेंट महाविद्यालय, पुणे, व्दितीय क्रमांक - इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, ताथवडे, बेस्ट शूटर - निखिल पाटील, बेस्ट डिफेंडर - प्रतिक कंग्राळकर, बेस्ट प्रॉमिसिंग प्लेयर - सौरभ बोरा. स्पर्धेचे संयोजन प्रा. अमरीश पद्मा आणि प्रा. काजल माहेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news