ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

फुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज विजयी

आंतरमहाविद्यालयीन युवोत्‍सव-२०१७ मध्ये ३६ संघांचा सहभाग

पिंपरी, दि. १३ - निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍टच्या एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाने आयोजित केलेल्या युवोत्‍सव-2017 क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाने निगडीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयावर दोन गोलने विजय मिळवला.

निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात तीन दिवसीय 'युवोत्‍सव - 2017' या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्‍हयातील ३६ संघ सहभागी झाले होते. सर्व विजेत्‍या संघास आणि सर्वोकृष्ट खेळाडुंना महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्‍टचे विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. डॅनियल पेणकर, डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते.

इंदिरा कॉलेजच्या अमेय पारखी याने सामन्याच्या सुरुवातीला आठव्या मिनिटाला पहिला गोल केला. अठराव्या मिनिटाला शुभम गायकवाड याने फ्रि कीकवर दुसरा गोल करून सामन्यावर वर्चस्व मिळविले. बेस्ट गोलकीपर - आकाश बटवा, बेस्ट गोल स्कोरर - ईश्वर चव्हाण, बेस्ट प्रॉमिसिंग प्लेअर - केविन घाडगे. प्रथम क्रमांक संघ - इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स, ताथवडे, व्दितीय क्रमांक संघ - पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, निगडी, तृतीय क्रमांक संघ - डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डी. स्पर्धेचे संयोजन प्रा. अमरीश पद्मा आणि प्रा. काजल माहेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी यांनी केले होते.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news