ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकच्या आणखी एका खेळाडूचं निलंबन

लाहोर, दि. १५ - पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणखी एका क्रिकेटरवर कारवाई केली आहे. पीसीबीने कसोटी क्रिकेटर नासिर जमशेदचं निलंबन केलं आहे. 

पीसीबीने गेल्या आठवड्यातच शर्जिल खान आणि खलिद लतीफवरही निलंबनाची कारवाई केली होती. त्या दोघांनी तपासणीदरम्यान नासिर जमशेदने आपली संशयित सट्टेबाजासोबत भेट घडवून आणण्याचं ठरवलं होतं, अशी माहिती दिली होती. त्यानंतर जमशेदवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

२७ वर्षीय नासिरने दोन कसोटी, ४८ वन डे आणि १८ ट्वेन्टी 20 सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं होतं. पण २०१५ सालच्या विश्‍वचषकानंतर तो संघाबाहेरच आहे. दोन वर्षांपूर्वी बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान बीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकानंही नासिरची चौकशी केली होती.

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news