ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

"विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आवडीचा क्रीडा प्रकार जोपासावा!"

श्रीनिवास वास्के यांचे आवाहन
बा. रा. घोलप महाविद्यालयाचे पारितोषिक वितरण 

पिंपरी, दि. ७ (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर एखादा आवडीचा क्रीडा प्रकार जोपासणे गरजेचे आहे. यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिश्रम आणि चिकाटी ठेवणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय यश मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी सातत्यशील असावे, असे प्रतिपादन "मिस्टर इंडिया' व "मिस्टर एशिया' किताब विजेता श्रीनिवास वास्के याने सांगवी येथे केले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2016-17 चा वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन श्रीनिवास वास्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेता सौरभ गोखले, मंडळाचे प्रशासन विभागाचे सहसचिव ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, डॉ. वैशाली नाईक, डॉ. सी. पी. हासे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विद्या पठारे, कार्यक्रम संयोजक डॉ. नरसिंग गिरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. माया मायीनकर, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे आदी उपस्थित होते. 

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर यांच्या हस्ते झाले. ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संवेदनशीलता, पर्यावरणाविषयी जाणीव जागृती, सामाजिक बांधिलकीची जोपासना करून शैक्षणिक क्षेत्रात आपली उंची निर्माण करण्याचे स्वप्न पाहावे. तर अभिनेता सौरभ गोखले म्हणाला की, अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय अभिनयाच्या क्षेत्रात येणार नाही असा निश्चय मी केला होता. त्याप्रमाणे आधी एमबीएची पदवी मिळविली. त्यानंतर आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे अभिनयाच्या क्षेत्रात ठसा उमटविला. अभिनयाचे ध्येय ठेऊन काम करू लागलो, असे त्याने सांगितले. 

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम घेण्यात आले. मूक नाट्य, पारंपरिक नृत्य, गायन आदी कलाप्रकारातून कलाकार विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदा राशिनकर, प्रा. सुवर्णा खोडदे, अश्विनी जोशी, प्रा. वसंत गावडे यांनी केले तर डॉ. नरसिंग गिरी यांनी आभार मानले.