ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तिसऱ्या दिवसअखेर भारत अजुनही ९१ धावांनी पिछाडीवर

रांची, दि. १८ - ऑस्‍ट्रेलिया‍ विरुध्‍दच्‍या तिसऱ्या कसोटी सामन्‍याचा तिसऱ्या दिवसअखेर भारताने ६ गडी गमावून ३६० धावा केल्‍या आहेत. मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा या जोडीने भारताला दमदार सुरुवात करुन दिली होती. त्‍यामुळे भारत आज सहज ४०० धावांचा पल्‍ला गाठेल असे वाटत होते. मात्र मुरली विजय बाद झाल्‍यानंतर पुजारा वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. 
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा पुजारा १३० धावांवर तर साहा १८ धावांवर खेळत होता. भारत ऑस्‍ट्रेलियापेक्षा ९१ धावांनी पिछाडीवर होता. खेळाचा उद्या चौथा दिवस असून भारताचे चार गडी अजून बाकी आहेत.
पहिल्‍याच दिवशी खांद्याला दुखापत झाल्‍यामुळे विराट कोहली या सामन्‍यात खेळू शकणार की नाही, याबद्दल शंका व्‍यक्‍त करण्‍यात येत होत्‍या. सर्व शंकाना पूर्णविराम देत विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र केवळ ६ धावा करुन विराट आऊट झाला.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघाने उपहारापर्यंत १९३ धावांची मजल मारली होती. मात्र, लंचटाईम होण्यासाठी अवघे काही चेंडू उरले असताना मुरली विजय ८२ धावांवर बाद झाला. ओकीफच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात तो यष्टीचीत झाला. तत्पूर्वी कालच्या १ बाद १२० धावसंख्येवरून भारताने आजच्या डावाची सुरूवात केली. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा ठाण मांडून मैदानात उभे राहिले होते.
काल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावांवर मजल मारली. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने दिवसाअखेरीस १ बाद १२० अशी समाधानकारक सुरूवात केली होती. भारताकडून केएल राहुल याने पुन्हा एकदा अर्धशतकी कामगिरी केली. तर दुसऱया बाजूला मुरली विजय धावांसाठी खूप झगडताना दिसला. केएल राहुल ऐन फॉर्मात असताना तो ६७ धावांवर झेलबाद होऊन तंबूत दाखल झाला. त्यानंतर पुजाराने मुरली विजयला संयमी साथ दिली.