ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुजाराच्या विकेटवर कन्फ्युज्ड झाले अंपायर

रांची, दि. २० - काही अंपायर्सनाही क्रिकेटविश्वात प्लेअर्ससोबत आजवर प्रसिध्दी मिळाली आहे. अनेक कारणांमुळे अगदी डिकी बर्डपासून ते स्टीव्ह बकनर, बिली बॉवडेन यासारख्या अंपायर्सना प्रसिध्दी मिळाली. काल ख्रिस गफोनी यांनीही अंपायर्सच्या या झळाळत्या यादीत स्थान मिळवले आहे.
चेतेश्वर पुजाराच्या द्विशतकाने कालचा दिवस गाजला तसा तो अंपायर ख्रिस गफोनी यांच्यामुळेही गाजला. पुजाराने हेझलवूडच्या एका बाऊंसरवर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल त्याच्या बॅटच्या कडेजवळून मागे गेला. यावेळी काही फील्डर्सनी अपील केलं पण त्यात तितकासा दम नव्हता. पण यानंतर अंपायर गफोनी यांनी पुजाराला आऊट देण्यासाठी हात वर केला पण त्यानंतर त्यांनी विचार बदलला आणि आपण त्या गावचेच नाही अशा थाटात आपण आपली हॅट सरळ करत असल्याचा आव आणला. पण यामुळे व्हायची ती गंमत झालीच.