ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गोलंदाजांच्या क्रमवारीत आर. अश्विन दुस-या स्थानावर

नवी दिल्ली, दि. २१ - आंतरराष्ट्रीय कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. तर अवघ्या सात गुणांच्या फरकाने अश्विनला क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे. 
जडेजाने रांची कसोटीत दोन्ही डावात मिळून ९ विकेट्स घेतल्या होत्या, तर अश्विनला केवल २ विकेट्स मिळाल्या. 
रांची कसोटीपूर्वी अश्विन आणि जडेजा क्रमवारीत सामाईकरित्या अव्वल स्थानी होते. पण रांची कसोटीत जडेजा अश्विनपेक्षा वरचढ ठरला आणि याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रमवारीवर देखील झाला. ८९९ गुणांसह जडेजा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला, तर अश्विन ८९२ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. रांची कसोटीचा निकाल लागू न शकल्याने मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियात १-१ अशी बरोबरी कायम आहे. धर्मशाला येथे होणारा चौथा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. धर्मशाला कसोटीत चांगली कामगिरी करून जडेजाला ९०० गुणांचा पल्ला गाठण्याचा विक्रम करता येणार आहे. याआधी अश्विनने ९०० गुणांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर कोणत्याच भारतीय गोलंदाजाला आयसीसी क्रमवारीत एका मोसमात ९०० गुण प्राप्त करता आले नव्हते.
दरम्यान आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत फलंदाजांच्या बाबतीत भारताचा ‘मिस्टर डिपेन्डेबल’ चेतेश्वर पुजारा याने थेट दुस-या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ ९४१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर पुजाराने ८६१ गुण मिळवत दुसरे स्थान गाठले आहे. पुजाराने इंग्लंडचा जो रुट (८४८) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (८२६) यांना मागे टाकले आहे. पुजाराने रांची कसोटीत महत्त्वाच्या क्षणी मैदानात टीच्चून फलंदाजी करत २०२ धावांची खेळी साकारली होती. पुजाराच्या द्विशतकामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर समाधानकारक आघाडी घेता आली..