ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

विराट कोहलीचे अमिताभ बच्चन यांनी केले समर्थन

मुंबई, दि. २२ - ऑस्ट्रेलियाच्या माध्यमाने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प आहे, असे एका लेखात म्हणत पुन्हा एकदा वाद निर्माण केला असून या प्रकरणात कोहलीला बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी समर्थन दिले आहे.
विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प असा उल्लेख ऑस्ट्रेलियन मीडिया करत आहे. त्याला विजेता आणि प्रेसिडेंट मानल्याबद्दल आभार!, असे ट्विट करुन बिग बींना विराटला समर्थन दिले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. बंगळुरू कसोटीमध्ये सुरू झालेल्या डीआरएसच्या खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र ‘द डेली टेलिग्राफ’ ने रांची कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली आहे. कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प असल्याचा उल्लेख एका लेखात करण्यात आला.
विराट कोहली नेहमीच प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिस्पर्धी मीडियाला जशास तसे प्रत्युत्तर देत असतो. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या वादग्रस्त लेखानंतर विराट कोहलीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रीडा समीक्षक हर्षा भोगले, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाच्या मीडियावर टीका करत खंत व्यक्त केली आहे. ‘द डेली टेलिग्राफ’च्या एका लेखामध्ये विराट कोहली जागतिक खेळातील डोनाल्ड ट्रम्प आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पप्रमाणे चुका दाखवल्यास विराट कोहली माध्यमांना दोष देतो.
‘द डेली टेलिग्राफ’ ने यापूवीर्ही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. दुस-या कोसाटीनंतर कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात अंपायरच्या रूममध्ये गेला आणि आउट का दिले? याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांवर स्पॉर्ट्स ड्रिंकची बाटली फेकली, त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप टेलीग्राफने केला आहे.