ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारताला विजयासाठी १०६ धावांचं आव्हान

धर्मशाला, दि.२७ - कसोटीत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १३७ धावांतच गुंडाळला. त्यामुळे या सामन्यात भारतासमोर आता विजयासाठी १०६ धावांचं आव्हान उभं आहे.
उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारचा तिखट मारा, त्यानंतर अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीनं ऑस्ट्रेलियन फलंदाजीचं कंबरडं मोडलं. ग्लेन मॅक्सवेलनं झुंजार खेळी करुन ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अपवाद वगळता कांगारुंचे बाकीचे फलंदाज अपयशीच ठरले आणि टीम इंडियानं या कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत केली.
धर्मशाला कसोटीत भारताचा पहिला डाव ३३२ डावात आटोपला असून भारताला ३२ धावांची  आघाडी मिळाली आहे. रवींद्र जडेजानं केलेली ६३ धावांची खेळी या आघाडीत महत्वाची ठरली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी भारतीय संघानं ६ बाद २४८ धावांची मजल मारली होती. आज जाडेजा आणि साहा यांनी सत्राची सुरुवात केली. जाडेजानं आपल्या शैलीत फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावलं. तर साहानं देखील चांगली फलंदाजी करत जाडेजाला साथ दिली. मात्र, जाडेजा बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद करण्यात कांगारुंना यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायननं सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर कमिन्सनंही ३ बळी घेतले.
दरम्यान, काल भारतानं सुरुवातीच्या धक्क्यानंतर टिच्चून फलंदाजी केली होती. सलामीवीर मुरली विजय स्वस्तात माघारी परतल्यानतंर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजाराने भारताची बाजू सांभाळली होती.
तर धर्मशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी ३०० धावांत आटोपला होता.
पदार्पणाच्या कसोटीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. तर उमेश यादवने २ तर अश्विन, जाडेजा आणि भुवनेश्वरने प्रत्येकी १-१  विकेट घेतल्या.
धर्मशाला कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.