ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अश्विनचा सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीने सन्मान

नवी दिल्ली, दि. २९ - भारताचा अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला धर्मशाला कसोटीतील विजयानंतर आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटवीरासाठीच्या सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीने गौरवण्यात आले आहे. अश्विनला हा पुरस्कार १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या कालावधीतील शानदार कामगिरीसाठी देण्यात आला.
सर्वोत्तम कसोटीवीर पुरस्काराचाही मानकरी अश्विनच ठरला आहे. या कालावधीत अश्विनने आठ कसोटी सामन्यात ४८ विकेट्स काढल्या होत्या आणि ३३६ धावा केल्या होत्या. या कालावधीत अश्विनने १९ ट्वेन्टी २० सामन्यांत २७ विकेट्सही काढल्या होत्या. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते अश्विनला ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली.