ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीयांची, विशेषत: कोहलीची माफी मागतो : ब्रॅड हॉज

मुंबई, दि. ३० - शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताचा सलामीवीर मुरली विजयची माफी मागितली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजलाही उपरती झाली आहे. विराट कोहलीच्या दुखापतीवरुन नको ते अंदाज लावून, उतावीळपणे प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी हॉजने माफी मागितली आहे.
विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. मात्र कोहलीने आयपीएलसाठी कसोटीतून माघार घेतली, असा अजब दावा ब्रॅड हॉजने केला होता.  त्याप्रकरणी हॉजने माफी मागितली आहे.
ब्रॅड हॉज म्हणाला की, देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरणं हा कोणत्याही खेळाडूचा सन्मान असतो. मात्र मी केलेल्या वक्तव्यामुळे, मी तमाम भारतीयांची, क्रिकेटप्रेमींची आणि विशेषत: विराट कोहलीची माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा, टीका करण्याचा किंवा कुणाची मानहानी करण्याचा माझा हेतू नव्हता.