ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राहुलपाठोपाठ अश्विन, विजयची आयपीएलमधून माघार

नवी दिल्ली, दि. १ - आयपीएलच्या दहाव्या हंगामात भारताचा आघाडीचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (रायझिंग पुणे सुपरजायंट्स) हर्नियामुळे आजारी असल्यामुळे खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचप्रमाणे भारताचे कसोटी सलामीवीर लोकेश राहुल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि मुरली विजय (किंग्ज इलेव्हन पंजाब) खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, तेसुद्धा संपूर्ण स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), रवींद्र जडेजा (गुजरात लायन्स) आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स) सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत.
अश्विन हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचा महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. दरम्यान १ जूनपासून चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू होत असून, या स्पर्धेसाठी अश्विनची तंदुरुस्ती ही भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. नुकत्याच संपलेल्या कसोटी हंगामात अश्विनने सर्व १३ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने तब्बल ७५० षटके गोलंदाजी केली आणि एकूण ८१ बळी घेण्याची किमया साधली आहे.
खांद्याच्या दुखापतीतून कोहली सावरू शकला नाही, तर आयपीएलच्या सुरुवातीच्या कालखंडात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व ए बी डी’व्हिलियर्सकडे सोपवण्यात येणार आहे. याचप्रमाणे लोकेश राहुलसुद्धा दुखापतीमुळे आयपीएलला मुकण्याची शक्यता असल्यामुळे बंगळुरूच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.