ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एका दिवसासाठी ५ कोटी रुपये घेणार विराट

नवी दिल्ली, दि. १ - आपल्या सर्व नव्या करारांसाठी एंडोर्समेंट फी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वाढवली असून पाच कोटी रुपये एका दिवसांसाठी केली आहे. कोणत्याही सेलिब्रेटीकडून आकारण्यात येणा-या एंडोर्समेंट फी मध्ये ही सर्वाधिक आहे. यासोबतच विराट कोहली इंटरनॅशनल स्पोर्ट्स स्टार्सच्या लीगमध्ये सामील झाला आहे.
कोहली एका दिवसासाठी गेल्यावर्षी पर्यंत अडीच ते साडे तीन कोटी रुपये मानधन आकारत होता. विराट कोहलीने पेप्सिकोसोबत असलेल्या कराराच्या नुतनीकरणाआधी आपल्या मानधनात वाढ केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीतपेयामुळे आरोग्याला पोहोचणा-या हानींमुळे पेप्सिकोसोबत असलेल्या आपल्या कराराचे नुतनीकरण करायचे की नाही यबाबत विराट कोहली साशंक आहे.
विराट कोहलीच्या मानधनावर काहीही बोलण्यास कोहलीचे प्रतिनिधित्व करणारी एजन्सी कॉर्नरस्टोन स्पोर्टने नकार दिला आहे. पेप्सीसोबत असलेला विराट कोहलीचा करार ३० एप्रिलपर्यंत आहे. आम्ही सर्व कंपन्यांशी करार वाढवण्याआधी मानधनावर चर्चा करत आहोत. पेप्सीसोबत आमचे जुने संबंध असून ते पुढेही तसेच राहतील अशी अपेक्षा असल्याचे, कॉर्नरस्टोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह यांनी सांगितले आहे.
कोहलीसोबत जोडल्या गेलेल्या दोन ब्रॅण्ड्सच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी विराट कोहलीच्या मानधनात वाढ झाली असल्याचे मान्य केले आहे. विराट कोहलीचे मानधन धोनी यशाच्या शिखरावर असताना होती त्यापेक्षाही जास्त असून त्याने अभिनेते रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांनाही मागे टाकले आहे. गेल्यावर्षी पेप्सिकोने धोनीसोबतचा आपला ११ वर्षाचा करार समाप्त केला होता.