ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्टीव्ह स्मिथचे पुणेरी फटके

पुणे, दि.४ - आयपीएलच्या दहाव्या मोसमाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मैदानात अव्वल ठरण्यासाठी सर्व संघांनी प्रयत्न सुरु केले असून वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. सर्व संघांवरील दडपण वाढत चाललं असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणा-या स्टीव्ह स्मिथने आपल्या संघातील वातावरण थोडं हलकंफुलकं करण्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चक्क पुणेकरांच्या पारंपरिक वेषात अवतरला आहे. 
आयपीएल पुणे संघाचं नेतृत्व सांभाळत असल्याने आधीच पुणेकर झालेल्या स्टीव्ह स्मिथने प्रमोशनच्या निमित्ताने संपुर्ण पुणेकर होण्याचं ठरवलं आहे. म्हणून प्रमोशनच्या निमित्ताने का होईना पण स्टीव्ह स्मिथने चक्क पुणेरी पारंपारिक वेष परिधान केला होता. इन्स्टाग्रामवर स्टीव्ह स्मिथने आपला फोटो शेअर केला असून स्मिथने बाराबंदी, धोतर, कमरेला शेला, गळ्याभोवती उपरणं आणि डोक्यावर पुणेरी पगडी असा पारंपरिक वेष परिधान केलेला दिसत आहे.