ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोहलीच्या अनुपस्थितीत शेन वॉटसन काळजीवाहू कर्णधाऱ

नवी दिल्ली, दि. ४ - ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉटसन विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व करणार असून आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे विराट कोहली आणि ए. बी. डिव्हिलीयर्स खेळू शकणार नाहीत. त्यामुळे शेन वॉटसनकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे नेतृत्व असेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच दुखापतींमुळे बेजार झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत विराट कोहलीला खांद्याला दुखापत झाल्यामुळे कोहली धरमशालात झालेल्या शेवटच्या कसोटीत खेळू शकला नव्हता. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विराट कोहली खेळणार नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी भारताच्या विजयात मोलाचा वाट उचलणारा के. एल. राहुल यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही. राहुलच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्यावर सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्मात असलेला राहुल आयपीएलच्या एकाही सामन्यात खेळणार नसल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
५ एप्रिलला आयपीएल-१० मधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ खेळणार आहे. या सामन्यात बंगळुरुच्या संघासमोर माजी विजेत्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत डिव्हिलीयर्स संघाचे नेतृत्व करेल, असे बंगळुरु संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. मात्र मायदेशात देशांतर्गत सामना खेळत असताना डिव्हिलीयर्सला पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याच्या उपस्थितीविषयी संघ व्यवस्थापनाला शंका आहे. त्यामुळे संघाची धुरा आता शेन वॉटसनकडे सोपवण्यात आली आहे.