ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सामनाधिकाऱ्यांनी धोनीला फटकारले

नवी दिल्ली – यंदाच्या सीजनचा पहिला सामना आयपीएलच्या नवव्या सत्रापर्यंत कर्णधाराच्या रुपात खेळलेल्या महेंद्र सिंह धोनीसाठी चांगला गेला नाही. ना फलंदाजीत ना कीपिंगमध्ये धोनी चमकला. त्याच्याकडून एक झेलही सुटला. आता त्याला आयपीएल आचारसंहितेच्या उल्लंघन केल्याप्रकरणी खडसावण्यात आले आहे.

याचे कारण आयपीएलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु सांगितले जात आहे की, धोनीने गुरुवारी झालेल्या सामन्यादरम्यान अशी मागणी केली, जी आयपीएल संहितेच्या दृष्टीने योग्य नव्हती. एमएस धोनीला रायजिंग पुणे सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात फटकारण्यात आले आहे. आयपीएलने हे स्पष्ट केलेले नाही की, मॅच रेफरी मनु नायर यांनी धोनीला कोणत्या कारणामुळे फटकारले आहे. आयपीएलच्या अधिकारिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘महेंद्र सिंह धोनीने खेळ भावनेच्या विरुद्ध व्यवहार केल्याप्रकरणी आयपीएल संहिता (अनुच्छेद २.१.१) नुसार गुन्हा कबूल केला आहे. आयपीएल आचार संहितेच्या या उल्लंघन प्रकरणी सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो.

धोनीने डीआरएसची केली मागणी, बाद होता पोलार्ड, परंतु तसे पाहिले गेले तर संपूर्ण सामन्यात महेंद्र सिंह धोनीने एकच चूक केली होती, आणि ती म्हणजे डीआरएसची मागणी करणे. पुणे टीमच्या क्षेत्ररक्षणावेळी धोनी विकेटकीपिंग करत होता. मुंबईच्या डावातील १५ वे षटक सुरू होते व केरॉन पोलार्डविरुद्ध पायचीतचे अपील करण्यात आले. पंचांनी ते अपील फेटाळल्यानंतर धोनीने अंपायरकडे रिव्यूची मागणी केली. म्हटले जात होते की, धोनीने तसे गंमतीमध्ये केले होते. कारण त्याला नियमांची माहिती नव्हती. धोनीच्या या मागणीमुळे सर्वजण हसले होते. अंपायर एस रविने जे अपील फेटाळले होते त्यामध्ये पोलार्ड बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. आयपीएलच्या १० सत्रात महेंद्र सिंह‍ धोनी कर्णधाराच्या भूमिकेत नाही. या स्पर्धेच्या १० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनी कर्णधार नाही. यंदा पुण्याचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ करत