ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पेस-भूपतीचा पुन्हा वाद चव्हाट्यावर

मुंबई : भारताचे टेनिस्टार लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कपमध्ये लिअँडर पेसला स्थान मिळल्यानं दोघांमधील वाद उफाळून आलाइतकंच नाही तर पेससोबतच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीन शॉट भूपतीने फेसबुकवर अपलोड केला आहे.

उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कप लढतीत भारताकडून कोण कोण मैदानात उतरणार यावरुन हा वाद आहे.

पेस-भूपतीच्या व्हॉट्सअॅप चॅटनुसार, महेश भूपतीने लिअँडर पेसऐवजी रोहन बोपण्णाला पसंती दिली आहे. त्यामुळेच भारताकडून मैदानात उतरायला मिळण्याच्या शक्यतेने पेस अत्यंत नाराज झाला आहे.

मात्र पेसला संघाबाहेर ठेवण्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही, असं भूपतीने म्हटलं आहे. याबाबतच पेससोबत झालेलं व्हॉट्सअॅप चॅट भूपतीने फेसबुकवर सार्वजनिक केलं आहे.