ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संजय मांजरेकरांवर संतापला पोलार्ड

मुंबई, दि. ११ - आयपीएलच्या दहाव्या सत्राचा ज्वर आता वाढू लागल्यामुळे यंदाही नेहमीप्रमाणेच आयपीएलमधील काही प्रसंग, वाद-प्रतिवाद बाहेर येऊ लागले आहेत. असाच एक वाद मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान निर्माण झाला आहे. समालोचक संजय मांजरेकर विरूद्ध किरोन पोलार्ड असा हा वाद आहे. पोलार्ड एका मोक्याच्या क्षणी बाद झाला, तेव्हा समालोचनादरम्यान, मांजरेकर यांनी पोलार्डबद्धल काही टिप्पणी केली. यावर पोलार्ड चांगलाच संतापला. त्याने मांजरेकरांच्या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

किरोन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो. रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सुरू होता. सामन्यादरम्यान, पोलार्ड १७ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला. या वेळी मुंबई इंडियन्सची स्थिती बाद ११९ अशी होती. मुंबईसमोर हैदराबादचे १७९ धावांचे लक्ष्य होते आणि केवळ चार ओव्हरच (षटके) शिल्लक होत्या. दरम्यान, मांजरेकर समालोचन करत होते. ऐन वेळी पोलार्ड बाद झाला हे पाहून, मांजरेकरांनी पोलार्डवर टीका केली. सहकारी समालोचकाने मांजरेकर यांना पोलर्डसाठी फलंदाजीचे आदर्श स्थान कोणते, असा प्रश्न केला. त्यावर पोलार्ड डावाच्या शेवटी सहा किंवा सात षटकांत फलंदाजी करण्यासाठी योग्य असल्याचे मत मांजरेकरांनी व्यक्त केले.

दरम्यान, पोलार्ड मांजरेकरांनी व्यक्त केलेल्या मतावर चांगलाच भडकला. त्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून पोलार्डने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. मांजरेकरांच्या मतावर प्रतिक्रीया देताना आपल्या ट्विटमध्ये पोलार्ड म्हणतो, बोलण्यासाठी पैसा मिळतो म्हणून मांजरेकर तुम्ही काहीही बरळण्यास मोकळे आहात का? तुम्ही भो-भो करणे सुरू ठेवू शकता. मला इतका पैसा का मिळतो, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मी इतका पैसा मिळविण्याचा हकदार आहे, अशा शब्दांत मांजरेकरांना प्रतिक्रीया देतानाच शब्दात मोठी ताकद असते. एकदा शब्द बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. शब्द जरा जपून वापरा, असा सल्लाही पोलार्डने मांजरेकरांना दिला आहे.